जळगाव, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. या प्रक्रियेची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर, 2021 असून ही परीक्षा शनिवार 30 एप्रिल, 2022 रोजी होईल. जिल्ह्यातील निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर 11.30 ते 1.30 या कालावधीत परीक्षा होईल. सदर परीक्षेचे माहिती पत्रक व प्रवेश अर्ज लिंक www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्व
संबंधितांनी माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचन करून पाचवीमध्ये शिकत असलेले सर्व
विद्यार्थी या प्रवेश परीक्षेस ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत, असे जवाहर नवोदय
विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय
पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहितीसाठी आर. पी. पाण्डेय (8668389523), जी.आर.
सरनाईक (8208888537) यांच्याशी सपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य श्री. खंडारे
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment