जळगाव, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) :- भारतीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरणाच्या आदेशान्वये एक जानेवारी 2022 पासून सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांचे कॅश मेमो, कॅश रिसिप्ट, विक्री बिलांवर 14 अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा 14 अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक हा त्या अन्न व्यावसयिकाची विशिष्ट ओळख दर्शवितो, असे विवेक प. पाटील, सहाय्यक आयुक्त (अन्न)ख् अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
परवाना
अथवा नोंदणी क्रमांकावरुन अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरुन
त्या अन्न व्यावसायिकाच्या परवान्याची वैधता, पेढीचे नाव व पत्ता याबाबत माहिती
ग्राहकास मिळू शकते. परवाना क्रमांक माहीत असल्यास ग्राहक हा थेट प्राधिकरणाच्या
संकेतस्थळावर अन्न पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास सदरची तक्रार संकेतस्थळावर
नोंदवू शकतो. यापूर्वी FSSAI क्रमांक पॅकिंग करण्यात आलेल्या अन्न पदार्थाच्या
लेबलवर टाकणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. परंतु, रेस्टॉरंट, मिठाई शॉप, केटरर्स
तसेच किरकोळ विक्रेत्यांना सदर क्रमांक वरील प्रमाणे कागदपत्रांवर टाकणे बंधनकारक
करण्यात आले आहे.
अन्न व्यावसायिक, अन्न पदार्थांचा शोध घेणे ग्राहक तसेच प्रशासनास सुलभ होणार
आहे. त्यामुळे अशा प्रकारे परवाना व नोंदणी क्रमांक अन्न व्यावसायिकांनी टाकून
प्रशासनास सहकार्य करावे. या तरतुदीचे पालन न केल्यास अन्न व्यावसायिकांवर अन्न
सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमन
2011 अंतर्गत कायदेशीर कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही नमूद करण्यात
आले आहे.
00000
No comments:
Post a Comment