जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : - मानव विकास कार्यक्रम 2011-12 अंतर्गत खरेदी केलेल्या फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, चोपडा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर, एरंडोल या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय दरात माती नमुने तपासुन देण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चालविण्यासाठी कृषी क्षेत्रात कार्यरत इच्छुक संस्थाना द्यावयाची आहे.
ज्या संस्था फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा
व्दारे शेतकऱ्यांना शासकीय दरात माती तपासणी करुन देण्यास तयार असतील, अशा
संस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत टप्पा -3
आकाशवाणी चौक, जळगाव यांच्याकडे 13 जानेवारी 2022 पर्यंत नावे अर्ज सादर करावेत,
असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment