Monday, 17 January 2022

स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणीचे इच्छुक संस्थांना आवाहन

                 जळगाव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत व विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविणाऱ्या व्हीटीपी-व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, व्हीटीआय-व्होकेशनल ट्रेनिंग इन्टि  ट्यूट आणि नोंदणीच्या प्रतीक्षेत, इच्छुक असणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण संस्थां स्कील इंडिया पोर्टलवर (TP-Training Provider & TC – Training Centre) नोंदणी  करणे आवश्यक  आहे.

                नोंदणीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपले (TP- TC) हे Fully Accrediated – मान्यता & Fully Affiliated – संलग्नता होईल याची दक्षता घ्यावी. संस्थेची / सेंटरची स्कील इंडिया पोर्टलवर Fully Accrediated -  मान्यता & Fully Accrediated संलग्नता प्राप्त झाल्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण उमेदवारांना देणे शक्य होईल.  स्कील इंडिया पोर्टलवरील नोंदणी व इतर अनुषंगिक माहितीसाठी पुढील लिंकचा उपयोग करावा.  Link :-  https://skillindia.gov.in  कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या संस्था/सेंटर यांनी स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन  वि.जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत महेश चौधरी जिल्हा कौशल्य विकास समन्वयक यांच्याशी कार्यालयील वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा. असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment