Friday, 7 January 2022

जात पडताळणी कार्यालयातर्फे आज विशेष मोहीम राबविणार

         जळगाव, दि. ७ (जिमाका) :-   निवडणूक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याकरीता कार्यालयात ८ जानेवारी, २०२२ रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी  त्रुटीपूर्तते अभावी  प्रलंबित असलेल्या प्रकरणातील अर्जदारांनी ८ जोनवारी, २०२२ रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते ६ पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर समोर, जळगाव) येथे ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रांसह ज्यांना त्रुटी ऑनलाईन ई-मेलव्दारे कळविण्यात आली आहे, अशा उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे. तसेच १२ व १३ जानेवारी  २०२२ रोजी ज्या उमेदवारांना ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही, अशा उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मूळ कागदपत्रांची पूर्तता करण्याकरीता उपस्थित राहावे. तसेच दक्षता पथक व सुनावणीसाठी प्रलंबित अर्जदारांना स्वतंत्ररीत्या संपर्क साधण्यात येईल. या कालावधीमध्ये आवश्यक ती त्रुटीपूर्तता करुन घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील.  त्रुटी पूर्तता / आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्यास होणाऱ्या नुकसानीस अर्जदार स्वत: जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे जिल्हा जात प्रमाणपत्र समितीव्दारे सशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment