जळगाव दि.15 ( जिमाका ) जल दिन २२ मार्च रोजी असतो त्यानिमित्तान जलसंपदा विभागामार्फत दि. १६ मार्च ते दि.२२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने आज दि. १५ मार्च २०२४ रोजी जलजागृती सप्ताहाचा उद्घाटन तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री.ज.द. बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या जलजागृती सप्ताह नियोजन समितीचे सदस्य श्री. श्री.दि. दळवी, अधिक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव, श्री. य.का. भदाणे, अधीक्षक अभियंता, जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगांव तसेच श्री. सागर रतीलाल महाजन, नीर फाउंडेशन, श्री प्रमोद ब-हाटे, संपादक, साईमत दैनिक, जळगांव, श्री. विजय पाठक, जेष्ठ पत्रकार, व समितीचे सदस्य सचिव श्री. ई.श. पढार, कार्यकारी अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव तसेच महामंडळांतर्गत असलेले कार्यकारी अभियंता सर्वश्री. दे. पू. अग्रवाल, श्री विनोद पाटील, श्री. य.म. कडलग, श्री.जी.एस. महाजन, श्रीमती अ. गि. कुलकर्णी, श्री. भोसले व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती परतवार यांनी केले. हे अभियान राबविण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ज.द.बोरकर यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळातील उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जलजागृती फक्त जलजागृती सप्ताहमध्ये न करता पूर्ण वर्षभर राबवून शेतकरी, नागरिक, पाणी वापर संस्था यांना पाणी बचतीचे महत्वाबाबत जलजागृती करण्यात यावी असे आवाहन केले.
तदनंतर श्री. तुषार महाजन, उपकार्यकारी अभियंता यांनी सर्वांना जल प्रतिज्ञा दिली व आभार प्रदर्शन श्री. सुभाष पंडीत चव्हाण उपकार्यकारी अभियंता, यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करणेकामी गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव या विभागाने विशेष प्रयत्न केले.
0000000000
No comments:
Post a Comment