मुंबई, दि. १३ - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विकसित केलेल्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT - Direct Benefit Transfer) करण्याकरिता https://sas.mahait.org/ हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे.
राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १५,९७,११६ तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे २९,६२,०१५ असे एकूण ४५,५९,१३१ इतके लाभार्थी आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. या संकेतस्थळाद्वारे संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आधार संलग्न बँक खात्यात लवकरच करण्यात येणार आहे.
000000000
| महासंवाद | DGIPR NEWS | बुधवार, १३ मार्च २०२४ |-२
संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांच्या थेट लाभ हस्तांतरण संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
https://mahasamvad.in/?p=123887
अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय अहिल्यादेवींचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=123881
ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव वेल्हे तालुक्याला मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देता आले याचा मनस्वी आनंद – उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=123884
नवी दिल्ली
चित्रकार मनाली बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ चित्र प्रदर्शनास प्रतिसाद
https://mahasamvad.in/?p=123893
MahaDGIPR चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला
महासंवाद - https://mahasamvad.in/
एक्स - https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/mahadgipr
युट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
टेलिग्राम चॅनल - https://t.me/MahaDGIPR या लिंकवर फॉलो करू शकता.
0000000000
No comments:
Post a Comment