Sunday, 3 March 2024

महासंस्कृती महोत्सवात 'खानदेश लोककला' संमेलन आज संपन्न; जिल्ह्यातील लोककलाकारांना मिळाला मंच

 





            जळगाव दि.3 ( जिमाका ) महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने महासंस्कृती महोत्सव जळगाव अंतर्गत 3 मार्च 2024 रोजी खानदेशी लोककलाकारांनी आज छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे विविध लोक कला सादर केल्या.

            खान्देश लोककलावंत विकास परिषद जळगाव यांच्या विशेष समन्वयातून लोककला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

            या लोककला संमेलनास संपूर्ण जळगावशहरासह जिल्हाभरातील  वहीगायन, शाहिरी, तमाशा, वाघ्या मुरळी, गोंधळी, आदी पारंपरिक लोककला प्रकारातील जवळपास 1500 लोक कलावंत उपस्थित होते.

संमेलनाच्या प्रारभी लोककलावंताच्या वतीने

शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेचा प्रारंभ समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. लोककला व लोक वाद्य वाजवत हजारो लोककलावंताची शोभायात्रा संभाजीराजे नाट्यगृह येथे आली.

            संमेलनांचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांनी हस्ते करण्यात आले.या प्रसंगी  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.अंकीत, समाजकल्याण सहायक आयुक्त  योगेश पाटील,लोककला अभ्यासक बाबाजी कोरडे, वृध्द कलावंत मानधन समिती चे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे,  युवा उद्योजग कुशल भाऊ गांधी, सौ. सरिता माळी कोल्हे अदी मान्यवर, उपस्थित होते..

            संमेलनाप्रसंगी कै. नथ्थुभाऊ भोकरकर सह सुकलाल भाऊ बोराडीकर यांच्या खानदेशी तमाशा फडाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

शाहीर शिवाजीराव पाटील आणि सहकारी यांचा गाथा शिवरायाची कार्यक्रम सादर करण्यात आला..

            संमेलनांत जिल्हाभरातील शाहीर,तमाशा,भारुड, गोंधळ वाघ्या मुरळी लोककला प्रकारासह १५० वही गायन मंडळे सहभागी झाले होते. संमेलनाचे समन्वयक खान्देश लोककलांवंत विकास परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

            या लोककला संमेलनाचे यशस्वीते साठी खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान चे सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, अरविंद पाटील, आकाश भावसार, देवराज भोसले, पंकज बारी, ऋषिकेश सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment