Monday, 21 July 2025

लंम्पी प्रतिबंधासाठी जिल्ह्यात उपाययोजना सुरु – उप आयुक्त डॉ. झोड यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी

 




            जळगाव, दि. २१ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – एरंडोल, धरणगाव व पारोळा तालुक्यांमध्ये गायींमध्ये आढळून आलेल्या लम्पी स्किन डिजीज (लंम्पी) च्या किरकोळ प्रकरणांमुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

            उप आयुक्त, पशुसंवर्धन, डॉ. प्रदीप झोड यांनी काल  एरंडोल, धरणगाव, पारोळा या तालुक्यात आढळून आल्याने तिन्ही तालुक्यांचा दौरा करून बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक पशुपालकांशी संवाद साधून रोगाचे गांभीर्य पटवून दिले आणि खालील बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले:

रुग्ण जनावरांचे विलगीकरण (Isolation)

योग्य निगा, स्वच्छता व व्यवस्थापन

प्रतिबंधात्मक उपाययोजना व वेळोवेळी मार्गदर्शन

स्थानिक पशुवैद्यकीय यंत्रणेशी समन्वय साधणे

            डॉ. झोड यांनी अधिकाऱ्यांना लंम्पी             चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            लंम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग सज्ज असून सर्व पशुपालकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

०००००००००००

 


No comments:

Post a Comment