जळगाव,
(जिमाका वृत्तसेवा) दि. 1 - कोरोना विषाणू
प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 14 एप्रिलपर्यंत
लॉकडाऊन ची घोषणा केलेली आहे. तसेच शासकीय कार्यालयात पाच टक्के उपस्थिती करण्यात
आलेली आहे.
विभागीय
आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवार लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात
येते. कोरोना विषाणू प्रसारावरील
प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे या महिन्याच्या दुसऱ्या सोमवार, दिनांक 13 एप्रिल, 2020 या दिवशी होणारा
लोकशाही दिनाचा कार्यक्रम वरील कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती दिलीप
स्वामी, उपआयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment