जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 8 - राज्यात 13 मार्च, 2020
रोजीच्या अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम, 1897 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.
साथरोग अधिनियम 1897 च्या खंड 2 ते 4 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार
महाराष्ट्र शासन राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा
प्रतिबंध व नियंत्रण यासाठी नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. व या नियमांना
महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 असे संबोधण्यात आले आहे.
साथरोग
अधिनियमाच्या खंड 2 (1) नुसार आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक, आरोग्य सेवा-1 संचालक
आरोग्य सेवा-2, संचालक, वैद्यकीयय शिक्षण व संशोधन सर्व विभागीय आयुक्त महसूल
विभाग, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित
करण्यात आले आहे. आता पोलीस आयुक्त यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-19
वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे
आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत
आहे.
ही
अधिसूचना राज्यात साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती निवारण कायदा 2005 लागू असेपर्यंत
अंमलात राहील. असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी
एका शासकीय परिपत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment