जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - येथील कोविड रुग्णालयात 21 एप्रिल
रोजी कोरोना संशयित म्हणून दाखल व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते. स्वॅब घेतलेल्या
व्यक्तींपैकी तीन रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून या तीनही रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहे.
या तीन रुग्णांमध्ये मलकापूर,
जि. बुलढाणा येथील 65 वर्षीय महिलेचा, भुसावळ येथील 43 वर्षीय महिला व अमळनेर
येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत
कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली आहे. यापैकी एक रुगण बरा होऊन घरी
गेला आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरित 10 रुग्ण कोरोना संसर्ग
कक्षात उपचार घेत आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ
भास्कर खैंरे यांनी दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment