Thursday, 30 April 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी




            जळगाव,(जिमाका) दि. 30 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविन्द्र भारदे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, नायब तहसिलदार रविन्द्र मोरे, नायब तहसिलदार विकास लाडवंजारी हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
00000

No comments:

Post a Comment