Tuesday, 4 May 2021

कोरोना संसर्गामुळे 10 मे रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नाही :विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

        नाशिक, दि.4 मे 2021 (विमाका वृत्तसेवा):-करोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंधाचे आदेश जारी केले असून, सदर निर्बंध 1 मे 2021 ते 15 मे 2021 पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे 10 मे  2021 रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन होणार नसल्याचे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

            प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार,प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे करण्यात येते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सदरचा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

            नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर,धुळे, जळगांव आणि नंदुरबार येथील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

000000

No comments:

Post a Comment