Thursday, 6 May 2021

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

             जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 6 - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शुक्रवार, दिनांक 7 मे, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

            शुक्रवार, दिनांक 7 मे, 2021 रोजी सकाळी 10.35 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय खरीप आढावा सभा 2021 ला उपस्थिती. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भागपूर उपसा सिंचन योजना आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांमधील नियोजित कार्यक्रमांना भेटी व उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगांवकडे प्रयाण व राखीव.

00000

No comments:

Post a Comment