Wednesday, 12 May 2021

दुचाकी वाहनांसाठी 17 मे पासून नवीन क्रमांकाच्या मालिकेस प्रारंभ

              जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांत परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांच्या नवीन  मालिकेस 17 मे, 2021 पासून सुरूवात होत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्या वाहनधारकांनी आपली मागणी  उप प्रादेशिक कार्यालय, जळगाव येथे 17 मे, 2021 या  दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सादर करावी.

           पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत वाहनधारकांनी शासकीय शुल्काचा डीडी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे तसेच ओळखपत्र व कोविड -19 ची मागणी 24 तासात तपासणी केलेला आर.टी.पी.सी.आर चाचणी निगेटीव्ह असल्याबाबतचा अहवाल आवश्यक असून तो सादर केल्यानंतरच या कार्यालयात प्रवेश करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 18 मे, 2021 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यत वाढीव शुल्काचा धनाकर्ष (डीडी) स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील. 18 मे, रोजी सायंकाळी 4.30 वाजता लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील याची सर्व संबंधित वाहनधारकांना नोंद घ्यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.                       

00000

No comments:

Post a Comment