Thursday, 20 May 2021

खरीप हंगामाबाबत कृषि विभागाचे नियोजन कृषि आयुक्तांची आज सह्याद्री वाहिनीवर मुलाखत

            पुणे, दि. 21 - राज्यात खरीप 2021 मध्ये 98% पाऊस पाडण्याचे दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविले आहेत. त्याअनुषंगाने बी- बियाणे, खते यांची उपलब्धतता, वितरण, गुण नियंत्रण आणि कृषि विस्तार विषयक कार्यक्रम यादृष्टीने कृषि विभागाचे असलेले नियोजन/ तयारी याची माहिती शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे.

            याबाबत सविस्तर माहिती देणारी धीरज कुमार, कृषि आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कृषि दर्शन कार्यक्रमात 21 मे, 2021 रोजी सायंकाळी 6.00 ते 6.30 दरम्यान प्रसारित होणार आहे .  

            शेतकरी बंधूंनी याचा लाभ घ्यावा, असे कृषि उपसंचालक (माहिती) कृषि आयुक्तालय, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment