जळगाव, दि. 28 (जिमाका) - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार,
दि. 29 मे, 2021 रोजी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार, दि. 29 मे रोजी दुपारी 2.00 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून शासकीय वाहनाने मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, उंचदा, शेमळदे व इतर ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी भेटी. दुपारी 4.45 वाजता रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपुर व इतर ठिकाणी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी भेटी. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
000000
No comments:
Post a Comment