जळगाव, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा)- मदरसांमध्ये विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयाचे शिक्षण देण्यात येत असलेल्या आणि आधुनिक शिक्षणाकरिता पायाभूत सुविधा, निर्माण करण्यासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरशांकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत अर्ज मागविण्यात येत आहेत. १० ऑगस्ट २०२३ पर्यंत मदरशांनी अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
मदरसा / मदरसे चालविणाऱ्या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोदणीकृत असणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यातील इच्छुक मदरशांनी शासन निर्णय ११ऑक्टोंबर २०१३ च्या तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे मुदतीत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment