जळगाव, दि.14 जुलै (जिमाका)- जिल्ह्यातील परवानाधारक कृषिनिविष्ठा विक्रेते तसेच बिगर परवानाधारक व्यक्तींसाठी कृषी विस्तार सेवांचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
या पदविका अभ्यासक्रमाचे नाव DAESI (Diploma in Agriculture Exemion Services For Inper Dealers) असे आहे. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०१७-१८ पासून नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्युट मार्फत करण्यात येत आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सदर अभ्यासक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. प्रशिक्षणार्थी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून परवानाधारक, बिगर परवानाधारक, कृषी व्यवसाय करणाऱ्या कंपन्या किंवा कृषी सहकारी संस्था आदींनी प्रायोजीत केलेले प्रशिक्षणार्थी यांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, खत परवाना छायांकीत प्रत, २ पासपोर्ट साईज छायाचित्र इ. आवश्यक कागदपत्रांसह प्रकल्प संचालक, (आत्मा), जळगाव कार्यालय, प्लॉट नं.१०, पुष्कराज बिल्डींग, दिक्षीत वाडी येथे संपर्क करावा.
अधिक माहितीसाठी देविदास पितांबर कोल्हे (लेखा-नि-लिपीक तथा सहाय्यक अधीक्षक, आत्मा, जळगाव) यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 9325390545 / 9423574803 वर संपर्क साधावा. असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment