Thursday, 6 July 2023

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

   जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) :-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत जळगाव येथील मागासवर्गीय  मुलांचे शासकीय वसतीगृह, सिंधी कॉलनी, जळगाव येथे  वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.  सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षाकरीता कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी दिनांक ३१ जुलै, २०२३ पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच  सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांनी दिनांक ३१ जुलै, २०२३ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह ,जळगाव यांनी केले आहे.

           प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवास, निर्वाहभत्ता, शैक्षणिक साहित्य व संगणक सुविधा व वायफाय सुविधा व इतर सोयी सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांकापर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतीगृहाशी संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती वैशाली पाटील, गृहपाल, मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                         ०००००

No comments:

Post a Comment