Thursday, 6 July 2023

डाक जीवन विम्याच्या खंडित झालेल्या पॉलीसीच्या पुनर्जीवन रक्कमेवर सुट

       जळगाव, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) :- भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल विमाच्या मागील खंडित झालेल्या पॉलीसीच्या पुनर्जीवन रकमेवर १ जून ते ३१ ऑगस्ट, २०२३ दरम्यान सूट देण्यात आली आहे.

  खंडित झालेल्या PLI-RPLI पॉलीसीच्या पुनर्जीवन हप्त्याची मिळणारी १ लाख रक्कमेपर्यंत दंडाच्या रक्कमेवर २५% सूट तर जास्तीत जास्त सूट/माफीच्या रक्कमेची मर्यादा २५०० रुपये आहे. १ लाख ते ३ लाख रक्कमेपयंत दंडाच्या रक्कमेवर २५% सूट असून जास्तीत जास्त सूट/माफीच्या रक्कमेची मर्यादा ३ हजार रुपये इतकी आहे. तर ३ लाख ते पुढील रक्कमेवर दंडाच्या रक्कमेवर २५% सूट असून जास्तीत जास्त सूट/माफीच्या रक्कमेची मर्यादा ३५०० इतकी असून ही रक्कम GST सोडून आहे.

  वरीलप्रमाणे सूट ही फक्त मागील खंडित झालेल्या PLI-RPLI पॉलीसीच्या पुनर्जीवन रक्कमेवर १ ते ३१ ऑगस्ट, २०२३ दरम्यान असून या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                     00000

No comments:

Post a Comment