जळगाव, दिनांक ६ (जिमाका वृत्तसेवा) :- कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्याचा जिल्हा कौशल्य विकास आराखडा (DSDP Plan 2023-24) मंजूर करण्यात आला असून यात कौशल्य प्रशिक्षणाच्या विविध योजनांसाठी 17 सेक्टर निश्चित करण्यात आले आहे. तर एकूण ६९ जॉबरोलसाठी प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेतंर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्ह्याचा मंजूर किमान कौशल्य विकास कार्यक्रम (DSDP Plan 2023-24) अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १६ सेक्टर निश्चित करण्यात आलेले असून एकूण ६२ जॉबरोलसाठी प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे.
सेक्टर व जॉबरोलची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परीसर, जी.एस.ग्राऊंडजवळ, जळगाव कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या संधीचा लाभ जिल्ह्यातील सूचीबध्द (Empanelled) झालेले प्रशिक्षण केंद्र (TC-Training Centre &VTI-Vocational Trg. Institute) यांनी तसेच कौशल्य विषयक प्रशिक्षण घेण्यास इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment