जळगाव, दि.४ (जिमाका वृत्तसेवा) - सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यावसायिक, कारखाने, कंपनी इ. यांनी त्यांच्याकडील माहे 1 एप्रिल ते ३० जून, २०२३ या कालावधीचे कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ई-आर-1) ३१ जुलै, २०२३ पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने सादर करावे, असे रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी कळविले आहे.
सेवायोजन
कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, १९५९ व नियमावली, १९६०
अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने १ एप्रिल ते ३० जून,
२०२३ या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे
त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-१) विभागाच्या नमूद संकेतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील
नियोक्ते वर क्लिक करुन आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने ३१ जुलै, २०२३
पर्यंत भरावयाची आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र.
०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. यात कसूर झाल्यास आणि आस्थापना दोषी आढळल्यास
कायदेशीर कारवाई होऊ शकते. असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
No comments:
Post a Comment