जळगाव, दि. ९ (जिमाका) – जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न
मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय
मिळावा. या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी
व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी एक प्रभावी
उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी
व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.असे श्रीमती
सोनगत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment