Thursday, 11 July 2024

जळगाव शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तात्पुरत्या स्वरूपात निदेशकांची नियुक्तीसाठी मागविले अर्ज

             जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्त):- शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ शासकिय तंत्रनिकेतन समोर, जळगांव या संस्थेतील खालिल व्यवसाया करीता / विषया करीता रिक्त असलेल्या जागांवर सप्टेंबर २०२४ पासून तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर निदेशकांची नियुक्त करावयाची आहे.

            शिल्प निदेशक , यंत्रकारागिर -०५, शिल्प निदेशक- यंत्रकारागिर घर्षक – ४, मेकॅनिक इलेक्ट्रॉमिक्स – २, विजतंत्री -४,रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग-१, जोडारी -४, कोपा-१, साचेकाम-                                                                                                                      दुल अॅण्ड डाय मेकर (जिग्ञ्ज/फिक.)-२, दुल अॅण्ड डाय मेकर (डायिज/मोल्ड)-०१, इन्स्ट्रूमेन्ट मॅकेनिक -०१,यांत्रिक मोटारगाडी - ०१, यांत्रिक डिझेल-२, कातारी-२, मेकॅनिकल मशिन दुल मेन्टनंस् -०१

 विषय शिक्षक -  गणित चित्रकला निदेशक-०८, एम्प्लॉयबिलिटी स्किल- ०४, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी-०२

 शिल्पनिदेशक पदा करीता शैक्षणिक पात्रता - संबंधीत विषयातील अभियांत्रिकी शाखेची पदवीका/पदवी अथवा संबंधीत व्यवसायात आय टी आय. उत्तीर्ण आवश्यक.

- एम्प्लॉबिलिटी स्किल करीता शैक्षणिक पात्रता :-

BBA/MBA किंवा कुठल्याही शाखेचा पदविधर/कुठल्याही शाखेची पदवीका व संबंधीत क्षेत्रातील ०२ वर्षाचा अनुभव तसेच इंग्रजी व संपर्क कौशल्य तसेच संगणक विषयीचे ज्ञान असणे आवश्यक.

 संबंधीत क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य- तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतिसह दिनांक २२ जुलै, २०२४ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात सादर करावे, मुलाखतीची तारीख वळ दुरध्वनी द्वारे नंतर कळविण्यात येईल. असे प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगांव, यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment