जळगाव, (जिमाका) दि. 8 - सदर जाहिर नोटीस महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ अन्वये नोंदणी तथा कराधान प्राधिका- यांना असलेल्या अधिकारात जारी करण्यात येत आहे. सदर नोटीसीद्वारे वाहनमालकांना ताबेदारांना / वित्तदात्यांना जाहिररित्या कर व दंड भरुन वाहने सोडवून घेण्याबाबत अवगत करण्यात येत आहे.
Monday, 8 July 2024
प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव वाहन कर / पर्यावरण कर थकीत असलेल्या व स्क्रॅप वाहनांचा लिलाव
या
कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या
वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली
आहे. मोटार वाहन कायदा कलम १९८८ मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी
प्राधिका-यास कळविणे बंधनकारक असतांना देखील सदर वाहनांच्या मालकांनी या कार्यालयास
तसे कळविलेले नाही. त्यासाठी ही जाहिर नोटीस जारी करण्यात येत आहे.
वाहनांच्या
मालकांनी / ताबेदारांनी / वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकापर्यंत कार्यालयात थकीत
कर / पर्यावरण कर / शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावित किंवा
लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास १२ जुलै, २०२४
पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव १५ जुलै, २०२४
रोजी दुपारी ४ वाजता करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
लिलाव
करण्यात येणा-या वाहनांची यादी वाहनांच्या प्रकारानुसार नोटीसबोर्डावर चिकटविण्यात
आलेली आहे. लिलावात सहभागी होणा-या व्यक्तीनी एकूण ०७ स्क्रॅप वाहनांकरीता डिमांड ड्राफ्ट
बंद लिफाफ्यात १५ जुलै, २०२४ दुपारी ०१.०० वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष
(डिमांड ड्राफ्ट) हा Dy RTO, Jalgaon { payable at SBI Main Branch, Jalgaon } या नावे
अंदाजित ०७ वाहनांच्या बोली रकमेचा सी.टी.एस. मानंकाप्रमाणे नाव नोंदणी करुन या कार्यालयात
उपरोक्त दिवशी जमा करणे आवश्यक आहे. लिलावाकरिता एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव
परत केला जाणार नाही. यांची नोंद घ्यावी. सोबत शॉप अॅक्ट लायसन्स, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र
व आधारकार्ड ची प्रत सादर करणे आवश्यक आहे. - लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीसमोर
लिलावाच्या दिवशी सर्वासमक्ष जमा झालेले बंद लिफाफ्यातील डिमांड ड्रॉफ्ट खुले करण्यात
येतील. ज्या व्यक्तीने सर्वाधिक किमतीचा डिमांड ड्रॉफ्ट जमा केलेला असेल त्याच खरेदीदारास
ते वाहन लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल - जाहिर लिलावाचे स्थळ प्रादेशिक परिवहन
कार्यालय, जळगाव दिनांक १५ जुलै,२०२४ वेळ ०४.०० वाजता. - जाहिर लिलाव करावयाचे ठिकाण,
अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती या कार्यालयाच्या
नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता जाहिर लिलाव रद्द करण्याचे
अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी स्वतःकडे राखून
ठेवले आहे.
असे
आवाहन कराधान प्राधिकारी, तथा मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
(अ.का.) प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.) नितीन सावंत यांनी कळविले आहे.
0000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment