Monday, 22 July 2024

युवा कार्य प्रशिक्षण

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्त):- " जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी जिल्हयातील युवकांना त्याच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात येत आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर योजनेचे कामकाज उदा. नोंदणी, आस्थापनाची नोदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विदयावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतील. तसेच बारावी, आय टी आय, पदविका, पदवी व पदव्युम्तर शैक्षणिक पात्रता धाराण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. लघु आणि मध्यम (SMES) व मोठे उदयोग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था, तसेच तालुका/जिल्हा/विभाग/राज्यस्तरीय कार्यालये या योजनेंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील.

 

विविध आस्थापना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदवतील किमान २० रोजगार देणा-या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. व उमेदवाराची पात्राता १२ वी पास/आय.टी.आय/पदविका/पदवी/पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्रचा अधिवासी असावा., उमेदवाराची आधार नोंदणी असावी., उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे., उमेदवारने कौशल्य रोजगार व उदयोजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

 

तसेच आस्थापना/उदयोग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. आस्थापना/उदयोगाने कौशल्य रोजगार उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना/उदयोगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी. आस्थापना /उदयोगांनी EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उदयोग आधार ची नोंदणी केलेली असावी.

 

याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ ते सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन रवीकुमार एम पंतम, प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment