जळगाव, दि.16 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा
2019 जळगाव शहरात एकूण 30 केंद्रांवर दिनांक 17 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10.00
ते दुपारी 1.00 वाजता आणि दुपारी 2.00 ते
सायंकाळी 5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. सदर परिक्षा शांततेत कायदा सुव्यवस्था
अबाधित राहून तसेच कुठलाही गैरप्रकार न होता पार पडाव्यात यासाठी उपोदघातातील (1)
चे पत्रान्वये माझे निर्दशनास आणुन देण्यात आले आहे.
लोकसेवा
आयोगाच्या परिक्षा केंद्रांच्या ठिकाणी गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी. डॉ.
अविनाश ढाकणे जिल्हादंडाधिकारी जळगाव फैजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1)
(2) व (3) खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार दिनांक 17 फेब्रुवारी-2019
सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 आणि दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपावेतो जळगाव
शहरातील एकूण 30 (तीस) परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परिक्षार्थी, नियुक्त
कर्मचारी, अधिकारी, पोलीस होमगार्ड
यांच्याशिवाय कोणीही प्रवेश करु नये असे आदेश देण्यात येत आहेत.
सर्व सबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस
बजविण्यास पुरेसा कालावधी नसलेले फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (2) नुसार
एकतर्फी काढण्यांत येत आहे असे जिल्हादंडाधिकारी, जळगाव डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका
प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आह.
०००
No comments:
Post a Comment