Thursday, 7 March 2019

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा



जळगाव, दि. 7 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पढीलप्रमाणे.
शुक्रवार, दिनांक 8 मार्च, 2019 रोजी सकाळी 6.45 वाजता अमृतसर एक्स्प्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. सकाळी 7.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वाजता जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. सकाळी 10.00 वाजता नियोजन भवन जळगाव येथे आयोजित मोर नदीवरील अंजाळे व पिळोदा पुलाचे बांधकाम प्रकल्पाचा ई-भुमीपूजन समांरभास उपस्थिती. सकाळी 10.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून शासकीय वाहनाने जैन हिल्स हेलीपॉडकडे प्रयाण. सकाळी 10.20 वाजता जैन हिल्स, हेलीपॉड येथून शासकीय हेलीकॉप्टरने पहूर, ता. जामनेरकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता पहूर हेलीपॅड ता. जामनेर येथे आगमन शासकीय वाहनाने कार्यक्रमस्थळी रवाना. सकाळी 10.50 ते 12.40 वाजेदरम्यान कार्यक्रमस्थळी आगमन व भागपूर सिंचन योजना, जिल्हा जळगाव टप्पा क्रमांक-2 अतंर्गत कार्यक्रमाच्या भुमीपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ-पहूर, ता. जामनेर दुपारी 12.40 वाजता कार्यक्रम स्थळावरुन पहूर हेलीपॅडकडे शासकीय वाहनाने प्रयाण. दुपारी 12.45 वाजता पहूर, हेलीपॅड ता. जामनेर, जिल्हा जळगाव येथून शासकीय हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.
0 0 0

No comments:

Post a Comment