जळगाव, दि. 21 :- देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी
पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी' दिन म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पाळण्यात आला .
जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी
माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्री. कदम यांनी
उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ दिली. उपजिल्हाधिकारी(महसुल) रविंद्र भारदे यांचेसह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment