जळगाव,
दि. 21 - अंबिका चौहान, वय 78
वर्षे, मु. काशी प्राथमिक विद्यालयाजवळ, सरहराजमीन, सरहसा जर्मी, मऊ भोपौरा, उत्तर
प्रदेश-275302 ही व्यक्ती 3 मे, 2019 रोजी ट्रेन क्र. 11060 अप गोदान एक्सप्रेस ही
गाडी रेल्वे स्टेशन नांदगाव येथे थांबली असता खाली उतरली. परंतु आजपावेतो घरी
पोहोचली नाही.
या व्यक्तीचे वर्णन उंची 5फुट 5 इंच
आहे. रंग गोरा, बांधा सडपातळ, केस पांढरे असून या व्यक्तीने क्रिम रंगाचा कुर्ता व पांढरे धोतर
घातलेले आहे. या व्यक्तीची बोलीभाषा हिंदी आहे. ही व्यक्ती कोणास आढळून आल्यास
रेल्वे पोलीस स्टेशन, चाळीसगाव येथे संपर्क साधावा. असे आवाहन व्हि. टी. जगदाळे,
पो. हे. कॉ. रेल्वे पोलिस स्टेशन,
चाळीसगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment