जळगाव दि. 24 :- लोकसभा निवडणूक 2019
च्या 03 जळगाव लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उन्मेश
भैय्यासाहेब पाटील हे विजयी झाले असून त्यांना 7,13,874 मते मिळाली. तर 04 रावेर लोकसभा मतदार
संघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीमती रक्षा निखील खडसे या विजयी झाल्या
असून त्यांना 6,55,386 मते मिळाली, असे 03 जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक
निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, 04 रावेर लोकसभा मतदार संघाचे
निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी घोषित केले
आहे.
03 जळगाव लोकसभा मतदार संघातील इतर
उमेदवारांना मिळालेली मते व पक्ष याप्रमाणे. गुलाबराव बाबुराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
3,02,257, राहुल नारायण बनसोडे, बहुजन
समाज पार्टी, 3,428, ईश्वर दयाराम मोरे, बहुजन मुक्ती पार्टी, 1,262, श्रीमती
अंजली रत्नाकर बाविस्कर, वंचित बहुजन आघाडी 37,366, संत श्री बाबा महाहंसजी महाराज
पाटील, हिंदुस्थान निर्माण दल, 1,295, मोहन शंकर बिऱ्हाडे, राष्ट्रीय समाजवादी पार्टी
(सेक्युलर), 670, शरद गोरख भामरे (सुतार),
राष्ट्रीय जनशक्ती पार्टी (सेक्युलर), 817, अनंत प्रभाकर महाजन, अपक्ष, 6,562, ओंकार बाबा चेनसिंग जाधव, अपक्ष 3,144, मुकेश
राजेश कुरील, अपक्ष, 1,383, ललीत (बंटी)
गौरीशंकर शर्मा, अपक्ष, 1,108, सुभाष
शिवलाल खैरनार, अपक्ष, 1,629 आणि संचेती रुपेश पारसमल, अपक्ष 3,150 मते मते मिळाली
आहेत.
04 रावेर लोकसभा मतदार संघातील इतर
उमेदवारांना मिळालेली मते व पक्ष याप्रमाणे. डॉ. उल्हास वासुदेव पाटील, इंडियन
नॅशनल कॉग्रेस, 3,19,504, डॉ. योगेंद्र
विठ्ठल कोलते, बहुजन समाज पार्टी , 5,705, अजित नामदार तडवी, राष्ट्रीय आम जनसेवा
पार्टी, 1,425, अडकमोल रोहीदास रमेश, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, 1,679, नितीन प्रल्हाद कांडेलकर, वंचित बहुजन आघाडी, 88,365,
मधुकर सोपान पाटील, हिंदूस्थान जनता पार्टी, 1,607, रोशन आरा सादीक अली, इंडियन युनियन मुस्लिम लीग,
1,103, गौरव दामोदर सुरवाडे, अपक्ष, 985, तंवर विजय जगन, अपक्ष, 1,141, नजमीन शेख
रमजान, अपक्ष, 2,581 आणि डी. डी. वाणी (फोटोग्राफर), अपक्ष 4,274 मते मिळाली आहेत.
000
No comments:
Post a Comment