Wednesday, 8 May 2019

खोटे नगर परिसरात आढळलेल्या प्राणी बिबट्या नाही नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - उपवनसंरक्षक दिगंबर पगार



        जळगाव,दि.8-जळगाव वनपरिक्षेत्रातंर्गत जळगाव शहरालगतच्या खोटे नगर परिसरात वाटीका आश्रमाजवळील गौरव पार्क येथे आढळलेला वन्यप्राणी हा बिबट्या नसल्याने नागरीकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. तसेच नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.असे आवाहन जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी केले आहे.
            शहरालगतच्या खोटे नगर परिसरात वाटीका आश्रमाजवळील गौरव पार्क येथे 4 मे, 2019  रोजी दुपारी 3.30 वाजता बिबट हा वन्यप्राणी दिसल्याचे श्री. अनिल शिवाजी भोसले यांनी दूरध्वनीव्दारे कळविले.त्यानुसार उपवनसंरक्षक डी.डब्ल्यु. पगार यांचे मार्गदर्शनाखाली वनविभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच वन्यजीव अभ्यासक श्री. विवेक देसाई यांनी संपूर्ण परिसराची  पाहणी  केली आहे. तसेच ज्या व्यक्तीने प्रत्यक्ष वन्यप्राणी पहिला त्यांचेशीही चर्चा केली असता त्यांनी पहिलेल्या वन्यप्राणी व पाहणीअंती आढळून आलेल्या प्राण्याच्या पाऊलखुणा ह्या बिबट्याच्या नसुन कुत्रावर्गीय प्राण्याच्या असल्याचे दिसून आले आहे.
त्याचबरोबर त्याठिकाणी 5 मार्च, 2019 पासून ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आलेले आहे.परंतु आजपावेतो सदर ट्रॅप कॅमे-यात कोणताही प्राणी दिसून आलेला नाही.त्याचबरोबरया परिसरात क्षेत्रीय कर्मचारी यांना गस्ती करणेबाबत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या परिसरात  एखादा  प्राणी  दिसल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. पगार, उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment