जळगाव, दि. 10 - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत
चालविण्यात येणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चोपडा रोड, गो-शाळेसमोर, अमळनेर जि. जळगाव या वसतीगृहात रिक्त जागांवर प्रवेश
अर्जाबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बाहेर
गावाहुन ये-जा करणाऱ्या व अमळनेर येथील शैक्षणीक संस्थांमध्ये
विद्यालयीन/महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मागावर्गीय विद्यार्थ्यांना कळविण्यात
येते की, अमळनेर येथील वसतिगृहात सन 2019-20 या शैक्षणीक वर्षासाठी शासकीय
वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, तसेच अनाथ व अपंग या प्रवर्गातील
विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असल्यास विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज त्वरीत
सादर करावेत.
प्रवेश अर्ज वसतिगृहाच्या
कार्यालयात विनामुल्य उपलब्ध असून परिपूर्ण भरलेले अर्ज निकाल लागल्यापासून 15
दिवसांच्या आत किंवा 30 जूनपर्यंत वसतिगृहात जमा करावेत. रिक्त जागांचा तपशिल
प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम वसतिगृहाच्या कार्यालयात पाहावयास मिळतील.
वसतिगृहांकडे एकूण प्राप्त अर्जांपैकी रिक्त जागांवर सहाय्यक आयुक्त यांचे
मान्यत्तेनुसार प्रवेश निवड आदेश करण्यात येतील.
वसतिगृहात निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य,
अभ्यासक्रमाची पुस्तके इत्यादि सुविधा विनामुल्य पुरविण्यात येतात. असे गृहपाल,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, अमळनेर जि.जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment