Thursday, 16 January 2020

लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर किटकनाशके उपलब्ध


जळगाव, दि. 16 (जिमाका) - मका व ज्वारी पिकावर अमेरीकन लष्करी अळीचा तर  कापुस पिकावर गुलाबी बोंड अळींचा प्रादुभाव दिसुन येत आहे. संबंधित पिकांवरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2019-2020 अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांचेमार्फत आपत्कालीन परिस्थितीत कापुस, मका व ज्वारी या पिकांवरील विविध किडींसाठी ॲझारडिरेक्टीन 1500 पीपीएम 5662 लीटर व इमॅमेक्टीन बेंझोएट 5 टक्के 1229.700 कि. या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत आहे. ही किटकनाशके महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांचेमार्फत अधिकृत डीलर मार्फत 50 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या कृषी सहाय्यक /कृषी पर्यवेक्षक /मंडळ कृषी अधिकारी /तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0000

No comments:

Post a Comment