Wednesday, 18 March 2020

महाराष्ट्र जमीन महसूल नियम 1971 मधील सुधारणा संकेतस्थळावर उपलब्ध


        जळगाव, दि. 18 (जिमाका) - महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनींची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या नियम 11 मध्ये सुधारणा करण्यासाठी शासन राजपत्रात 14 फेब्रुवारी रोजी प्रसिध्दी केलेली आहे. सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कायदे व नियम या शिर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने काही हरकती व सूचना असल्यास शासनाकडे पाठविण्याच्या सूचना अवर सचिव सुनिल कोठेकर यांनी केल्या आहेत.
0000

No comments:

Post a Comment