जळगाव.दि.02- महाराष्ट्र
राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत
राज्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचनसंस्कृती
वृध्दींगत व्हावी या उद्देशाने दरवर्षी ग्रंथोत्सव हा उपक्रम जिल्हा ग्रंथालय
अधिकारी,जळगाव यांच्या कार्यालयामार्फत आयाजित करण्यात येतो.त्यानुसार यावर्षीच्या
ग्रंथोत्सवाचे आयोजन 14 व 15 मार्च 2020 अशे दोन दिवस जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या
अध्यक्षतेखाली अग्रवाल सभागृह, व.वा.वाचनालय,नवी पेठ,जळगाव येथे करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवात
विविध लेखकांचे विविधाअंगी तसेच वाचनिय पुस्तके ठेवण्यात येणार आहे.शिवाय विविध
सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वाचनप्रेमींनी ,जिल्ह्यातील
वाचनालये, लेखक,साहित्यिक,कवी,शिक्षक,विद्यार्थी तसेच नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजक जिल्हा ग्रंथालय,अधिकारी
,जळगाव सुहास रोकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment