जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 31:-
दोन दिवसापूर्वी जळगावमध्ये कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण आढळून आला आहे. सुरक्षेचा
उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीन या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एकूण 26 संशयितांचे
नमुने घेतले होते. सदरचे नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथील
प्रयोगशाळेत कोविड-19 च्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये पॉझिटिव्ह
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या नमुन्यांचाही समावेश होता.
या नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून आज
प्राप्त झाला असून त्यामध्ये सर्व संशयितांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला
आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक राहणे गरजेचे आहे. असे शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment