जळगाव (जिमाका वृत्तसेवा)
दि. 26 - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांचेकडील 14 मार्च,
2020 रोजीच्या पत्रानुसार कोरोना विषाणू (कोव्हिड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्च पासून लागु करून खंड 2 ते 4
मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचित निर्गमित करणेत आलेली आहे. तसेच
प्रतिबंधात्मक योजनांचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांच्या 21 मार्च
2020 च्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी व तत्सम
प्रकारचे दुकाने हे 23 मार्चपासून पुढील आदेशांपर्यंत पुर्णपणे बंद करण्यात आलेले
आहेत.
जळगाव
शहरात नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरीता एकटे राहणाऱ्या व्यक्ती व इतरांची फुड
पार्सलची निकड लक्षात घेता शहरातील एकूण 9 हॉटेल/रेस्टॉरंट यांना पार्सल काऊंटरची
अनुमती देण्यात आलेली आहे. त्या हॉटेल्स/रेस्टॉरंटची नावे संपर्क क्रमांक व
त्यांचा पत्ता पुढीलप्रमाणे-
हॉटेल
सिल्वर पॅलेस-0257-2232888 स्टेशन रोड, जळगाव, हॉटेल मुरली मनोहर-0257-2234697
आकाशवाणी चौक, जळगाव, हॉटेल शालीमार-0257-2233627 भास्कर मार्केट, जळगाव, हॉटेल
मुरली मनोहर-0257-224678 अजिंठा चौफुली, जळगाव, हॉटेल उत्तम भोज-0257-2229701
चित्रा चौक, जळगाव, हॉटेल गौरव-9823248333 खेडी रोड, जळगाव, हॉटेल जलसा-
9822195556 बहिणाबाई उद्यान, जळगाव, हॉटेल रसिका-9420348757 मानसिंग मार्केट,
जळगाव, हॉटेल कॅफे चॅकोलेड-9371333373 आदर्शनगर, जळगाव या 9 हॉटेल्स/रेस्टॉरंट
यांनाच फुड पार्सलची परवानगी देण्यात आलेली आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद
घ्यावी. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव वामन कदम यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment