Monday, 2 March 2020

किनगाव ता.यावल येथील आठवडे बाजारच्या वेळेत बदल


जळगाव.दि.02:- यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयात एस.एस.सी चे परीक्षा केंद्र असल्याने आणि 3 मार्च 2020 पासून परीक्षा सुरू होत असल्याने परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी बैठक व्यवस्था किनगाव येथील नेहरू विद्यालयातील इमारतीत आहे. परिक्षा केंद्राच्या दोघ इमारतींना लागून मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. बाजारातील गर्दीमुळे परीक्षार्थींना त्रास व अडथळा होत असतो तसेच गर्दीमुळे परीक्षा घेण्यास अडचण निर्माण होवून परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नसल्याने मंगळवार 03 मार्च 2020 रोजीच्या आठवडे बाजारच्या वेळेत बदल केला असून तो आता दुपारी 2.00 वाजेनंतर भरविण्यात येणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी, जळगाव डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                   ******

No comments:

Post a Comment