जळगाव,
(जिमाका) दि. 5 : समाज कल्याण आयुक्त, पुणे यांच्याकडील 4 मार्च, 2020 रोजीच्या
बैठकीतील निर्णयानुसार महाडीबीटी पोर्टलवर महाविद्यालयीन स्तरावरील प्रलंबित
अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विजभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे
शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज 8 मार्च 2020 पूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, जळगाव या कार्यालयाच्या लॉग इनवर पाठवावेत.
शिष्यवृत्ती
व इतर योजनांसाठी 8 मार्च नंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही.
महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित
राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी
महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव
योगेा पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment