Tuesday, 2 June 2020

सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षाच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराकरिता 15 जून, 2020 पर्यत प्रस्ताव सादर करावे


        जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि.2 :- केंद्रशासनामार्फत राज्य व राष्ट्रीय पातळीवर युवकांच्या विकासाकरिता राष्ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 15 ते 29 वयोगटातील युवक, युवती व नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थाना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. केंद्रशासनामार्फत सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षाचे राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
            त्याकरिता युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, युवा कल्याण विभाग, नवी दिल्ली यांनी सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षाच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविलेली आहेत. पुरस्काराबाबत अधिक माहिती व अर्ज करीता www.yas.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
            ज्या युवक, युवती व नोंदणीकृत संस्था यांना राष्ट्रीय युवा पुरस्काराकरिता आपले प्रस्ताव सादर करावयाचे आहेत त्यांनी आपले प्रस्ताव दिनांक 15 जून,2020 पर्यत दोन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय जळगाव ए.विंग श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव मिलींद दिक्षित यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment