जळगाव,
दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : - मे. महाविर कृषि केंद्र, घाटरोड चाळीसगाव येथे
18:18:10 या ग्रेड नमुद असलेल्या बेकायदेशीर बोगस
खताच्या 500 गोण्या दिनांक 11 जून, 2020 रोजी मेहुणबारे येथील शेतातील
गोडाऊन व पत्राच्या शेडमधुन तीच ग्रेड नमुद असलेल्या 200 गोण्या असे एकूण 700
गोण्या कृषि विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिका-यांनी सापळा रचुन धडक कार्यवाही
करुन जप्त केले आहे. याबाबत चाळीसगाव शहर
व मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे संबधीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन मे.
महाविर कृषि केंद्र, घाटरोड, चाळीसगाव यांचा किरकोळ व घाऊक खत विक्री परवाना व मे.
रुपेश कृषि केंद्र, चिंचगव्हाण ता.
चाळीसगाव यांचा खत परवाना रद्द करण्यात आला आहे.
यामुळे
बोगस खते विक्री करणा-या विक्रेत्यांना चपराक बसली असुन शेतकरी बांधवांनी 18:18:10
व इतर तत्सम खते खरेदी करतांना अधिकृत विक्रेत्यांकडुन पक्के बिल घ्यावे व बिलावर
कंपनीचे नांव, पत्ता व इतर सर्व बाबींचे रकाने भरलेले असल्याची खात्री करुन खत
खरेदी करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment