जळगाव, दि. 2 :- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरांतील नामांकीत
इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेश
देण्यात येतो. ही योजना आदिवासी विकास विभागामार्फत सन 2010-2011 या शैक्षणिक
वर्षापासून दर वर्षी राबविण्यात येत आहे. यानुसार अनुसूचित जमातीच्या पात्र
विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 28 फेब्रवारी पर्यंत प्रवेश अर्ज मागविण्यात आले
होते. आदिवासी विभागाच्या 22 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार सन 2020-2021 या
शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शहरातील नामांकित
शाळांमधील प्रवेशास स्थगिती देण्यात आली आहे.
तरी ज्या पालकांनी आपल्या पाल्याचा
शहरांतील नामांकित शाळा प्रवेशासाठी अर्ज केलेले आहेत अशा पालकांनी आपल्या
पाल्यांचे प्रवेश त्या-त्या कार्यक्षेत्रांमधील इतर शाळांमध्ये आपल्या इच्छेनुसार
घ्यावेत, असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास यावल, श्रीमती विनीता सोनवणे
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment