जळगाव,
दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान
संस्थेतील 2020- 2021 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व
वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता महाराष्ट्र
राज्यातून बरगड (ओडिशा) येथे 13 व व्यंकटगिरी येथील 2 जागांच्या प्रवेशासाठी पात्र
उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
या
निवडीसाठी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद
यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात आले
आहेत. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषांगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे
संकेतस्थळ http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक
वस्त्रोद्योग उपायुक्त यांच्या कार्यालयातही उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग
विभागाच्या आयुक्त डॉ.
माधवी खोडे चवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment