Wednesday, 16 December 2020

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्ताने 18 डिसेंबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

             जळगाव, (जिमाका) दि. 16 - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि इकरा शैक्षणिक संस्था, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक हक्क दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील उमेदवारांसाठी शुक्रवार, 18 डिसेंबर, 2020 रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत अल्पसंख्यांकासाठी विविध योजना या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

            या मार्गदर्शन सत्रास डॉ. करीम सालार, अध्यक्ष, इकरा शैक्षणिक संस्था, जळगाव हे अल्पसंख्यांकांसाठीच्या विविध योजना व इतर अनुषंगिक बाबींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिट वर करण्यात आलेले असून त्याची लिंक https://meet.google.com/xow-txfa-wfa याप्रमाणे आहे.

            जिल्ह्यातील जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारांनी याचा मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००

No comments:

Post a Comment