जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील शुक्रवार, 4 डिसेंबर, 2020 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शुक्रवार, 4 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 6.45 वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन, तेथून पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण, सकाळी 7.15 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता पाळधी येथून लाडली, ता. धरणगावकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षाच्या जिल्हा बैठकीसाठी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण व उपस्थिती, दुपारी 1.30 अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून पाळधीकडे प्रयाण, दुपारी 4.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. त्यानंतर पाळधीकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment