जळगाव, दि. 2 (जिमाका) - महाराष्ट्र राज्यातील सर्व निवृत्तीवेतन धारकांचे दरवर्षी माहे नोव्हेंबर मध्ये हयातीचे दाखले सादर केले जातात. हा दाखला माहे नोव्हेबर मध्ये घेतला जातो. परंतु कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकाना हयातीचा दाखला सादर करण्यास दिनांक 18 सप्टेंबर, 2020 च्या शासन परिपत्रकान्वये दि. 31 डिसेंबर, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
सदर हयातीचा दाखला हा जीवन पोर्टल मार्फत सादर करणे, पूर्वीप्रमाणे बॅकेमार्फत कोषागारास हयातीचा दाखला सादर करणे, प्रत्यक्ष कोषागारात जावून हयातीचा दाखला सादर करणे, पोष्टव्दारे हयातीचा दाखला सादर करता येईल.
तरी राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन प्र. सी. पंडीत, जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
Wednesday, 2 December 2020
निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला 31 डिसेंबरपर्यंत सादर करावा - जिल्हा कोषागार अधिकारी प्र.सी.पंडीत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment