Friday, 11 December 2020

नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत सहभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन

 जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : नवी दिल्ली येथील केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळातर्फे होणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शासकीय  कर्मचाऱ्यांनी कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडाधिकारी यांनी प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.

केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्या वतीने त्या- त्या राज्यात आयोजित केल्या जातात. या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील राज्य शासनाचा संघ निवड चाचणी घेवून स्पर्धासाठी पाठविले जातात. राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धांसाठी राज्य शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या विभागात, कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालय, विभागात कार्यरत खेळाडू, नियमित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी.

टेबल- टेनिस, बॅडमिटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलिबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, लघु नाट्य, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग, शरीरसौष्टव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धातून जे खेळाडू, कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे भरुन ते कार्यालय प्रमुख, विभागप्रमुखांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या एक आगाऊ प्रतिसह पाठवावे. अशी आवेदन पत्रे ही जिल्हा  क्रीडाधिकारी यांच्या मार्फत शिफारशीसह मानद महासचिव, सचिवालय जिमखाना, मुंबई 40032 यांच्या कडे 31 डिसेंबर 2020 पर्यंत पाठविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी व आवेदन पत्राच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव येथे दिलेल्या विहित मुदतीत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी श्री. दीक्षित यांनी केले आहे.

००००

No comments:

Post a Comment